ताज्या बातम्यापुणेशिक्षण

टिळक विद्यापीठाची चिंदीचोरी; लाखो रुपये फी घेऊनही पदवीच्या गुंडाळी करता ५०० रुपयांची मागणी

पुणे | देशासाठी सर्वस्व वाहिलेल्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या संस्कारांचा वारसा सांगणाऱ्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची चिंदीचोरी प्रवृत्तीचा कळस शनिवारी पाहायला मिळाला. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा ४० वा पदवीप्रदान सोहळा शनिवारी सकाळी टिमविच्या मुकुंदनगर येथील संकुलात झाला. यावेळी या सोहळ्यासाठी अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती. या सोहळ्यात एक अजब प्रकार घडला तो म्हणजे पदवी च्या प्रमाणपत्रासाठी वेगळी ५०० ते १००० रुपयाची मागणी विद्यापीठाकडून केली गेली. खरेतर लाखो रुपये फी घेतल्या नंतर हे वेगळे शुल्क घेणे अत्यंत चुकीचे असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले.

या विरुद्ध शनिवारच्या सोहळ्यादरम्यान विद्यार्थ्यांनी अक्षरशः थैमान घातले. दीड ते दोन लाख रुपये फी देऊन पदवी मिळवल्यानंतर देखील त्या पदवीचे प्रमाणपत्र घेण्यासाठी पुन्हा आमच्याकडून ५०० ते १००० रुपयाची मागणी केली जात आहे याचा आम्ही निषेध करतो, असा आक्रोश व्यक्त करीत विद्यापीठाच्या या प्रवृत्ती विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना अडविले त्यामुळे विद्यापीठाचे वातावरण काही वेळेपुरते तणावजन्य झाले होते.

शैक्षणिक संस्थांना चाप कधी ? 

पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. टिमवि मधील असा प्रकार शैक्षणिक क्षेत्रात खळबळ घडवणारा आहे. भरमसाठ फी आकारल्यानंतर पदवी प्रमाणपत्रासाठी घेण्यात येणारे अतिरिक्त शुल्क निंदनीयच आहे. फी वाढवून मनमानी कारभार करणाऱ्या शैक्षणिक संस्थांना चाप बसला पाहिजे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांची गळचेपी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या विचारधारेला अशोभनीय आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये