उद्योगपती अविनाश भोसले यांना तुरुंगात पाठवण्याचे आदेश; वाचा सविस्तर बातमी
मुंबई | प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांना कोर्टाने दणका दिला आहे. डीएचएफएल (DHFL) आणि येस बँक घोटाळा (Yes Bank Scam) प्रकरणी अटकेत असलेले अविनाश भोसले यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पण कोर्टाने अविनाश भोसले यांना तीन दिवसांत तुरुंगात पाठवण्याचे आदेश दिले आहेत.
2018 सालातील हे प्रकरण आहे. त्यावर्षी एप्रिल ते जूनच्या काळात हजारो कोटी रुपये एका खआत्यातून दुसऱ्या खात्यात वळवण्यात आले होते. त्यात मोठ्या उद्योजकांच्या कंपन्यांचा सहभाग होता. यात अविनाश भोसले, संजय छाब्रिया, बलवा व गोएंका यांचा समावेश होता. या प्रकरणी गेल्यावर्षी एप्रिलच्या अखेरीस सीबीआने छापेमारीही केली होती. या प्रकरणी अविनाश भोसले यांना कोर्टाचे आदेश आले आहेत. तीन दिवसात जे.जे. हॉस्पिटलमध्ये सर्व तपासणी, चाचणी पूर्ण करून भोसले यांना तुरुंगात पाठवावे, असा आदेश मुंबई सेशन्स कोर्टातील विशेष पीएमएलए कोर्टाने दिला आहे. अविनाश भोसले यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.