Dream Girl 2 Teaser : ‘पूजा’ पुन्हा येतेय चाहत्यांच्या भेटीला; ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार ‘ड्रीम गर्ल २’

Dream Girl 2 Teaser : आपल्या आवाजाच्या जादूने लोकांना वेड लावणारी ‘पूजा’ आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा आगमन करतीये. अभिनेता आयुषमान खुरानाचा नवीन चित्रपट ‘ड्रीम गर्ल 2’ चा टीझर समोर आला आहे, ज्यामध्ये पूजा पठाण सोबत बोलताना दिसत आहे. पूजाचा फोन वाजतो आणि ती फोन रिसिव्ह करून बोलते, “हॅलो, मी पूजा बोलतेय, तुम्ही कोण?” त्यावर पलिकडून शाहरुखचा आवाज येतो, “पूजा, मी पठाण.” हे ऐकून पूजा म्हणते, “उफ्फ, कसा आहे माझा पठाण.” तर शाहरुख तिला म्हणतो, “आधीपेक्षा जास्त श्रीमंत, हॅप्पी व्हेलेंटाईन्स डे पूजा.” यानंतर पुढे त्यांचं काय बोलणं होतं हे पाहण्यासाठी तुम्हाला हा ट्रेलर पाहावाच लागेल.
‘ड्रीम गर्ल 2’च्या टीझरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. या टीझरमध्ये पूजा कॉल सेंटर सोडून थेट ‘पठाण’शी बोलताना दिसत आहे. टीझरमध्ये पूजा खूपच वेगळ्या आणि मॉडर्न लूकमध्ये दिसत आहे आणि ही भूमिका बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आयुष्मान खुरानाने साकारली आहे.
आयुष्मान खुरानाचा हा चित्रपट येत्या 7 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन राज शांडिल्य करत आहेत तर एकता कपूर या चित्रपटाची निर्माती आहे. मीडिया रिपोर्टनुसार या चित्रपटात अनन्या पांडे, परेश रावल, राजपाल यादव, असरानी, विजय राज, मनोज जोशी, सीमा पाहवा, अभिषेक बॅनर्जी आणि मनज्योत सिंह यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहेत.