‘ड्रीम गर्ल 2’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीस, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

मुंबई | Dream Girl 2 – बाॅलिवूड अभिनेता आयुष्यमान खुरानाचा (Ayushmann Khurrana) ‘ड्रीम गर्ल’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला होता. या चित्रपटानं बाॅक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टची आतुरतेनं वाटत पाहत होते. अखेर या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच ‘ड्रीम गर्ल 2’ (Dream Girl 2) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
‘ड्रीम गर्ल 2’ हा चित्रपट 7 जुलैला प्रदर्शित होणार होता. मात्र, नंतर या चित्रपटाची रिलीड डेट पुढे ढकलण्यात आली. तर आता हा चित्रपट 25 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे.
‘ड्रीम गर्ल 2’च्या रिलीज डेटबद्दलची माहिती आयुष्मान खुरानाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे. त्याने पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, “माझे प्रिय आशिकों.. चार वर्षांनंतर तुमच्या हृदयाच्या टेलिफोनची रिंग पुन्हा एकदा वाजणार आहे. तर त्यासाठी शानदार, दिमाखदार तयारी तर झालीच पाहिजे ना? त्यामुळे थोडी वाट पहा आणि तुमचं माझ्यावरचं प्रेम असंच राहुद्या.” आयुष्यमाननं शेअर केलेल्या या पोस्टमुळे चाहत्यांना ‘ड्रीम गर्ल 2’बद्दल चांगलीच उत्सुकता लागली आहे.