ताज्या बातम्यारणधुमाळी

“आता मंत्रीपद मिळालं नाही तर…”, बच्चू कडूंचं सूचक विधान!

अमरावती | Bacchu Kadu – राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात नवीन सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधारी मित्रपक्षांपैकी कुणाला मंत्रीपदं मिळणार? याची चर्चा पाहायला मिळत आहे. त्यामध्ये प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bacchu kadu) यांनी सामाजिक न्याय विभागाचं मंत्रीपद मिळावं, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, सरकार स्थापन होऊन तीन महिने उलटूनही बच्चू कडूंना मंत्रीपद देण्यात आलेलं नाही. त्यामुळे त्यांना मंत्रीपद मिळणार की नाही? यावरून राजकीय तर्क-वितर्क सुरू आहेत. यासंदर्भात आता स्वत: बच्चू कडूंनी मोठं वक्तव्य केलं आहे.

अमरावती जिल्ह्यातील अतीवृष्टी आणि त्यानंतर शेतकऱ्यांना मिळालेली मदत यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना बच्चू कडूंनी आपली प्रतिक्रिया दिली. शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्याचा दावा प्रसार माध्यमांनी करताच बच्चू कडूंनी त्यावर स्पष्टीकरण दिलं. “तुम्ही पाहात नसाल, तर माझ्यासोबत चला. शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले पैसे दाखवतो. दोन दिवस आधीच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत”, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे.

पुढे बच्चू कडूंना मंत्रीपद मिळणार कधी? याविषयी माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केली असता बच्चू कडूंनी त्यांनाच प्रतिप्रश्न केला. “यावर बोलायला मी काय प्रमुख आहे का?” असा मिश्किल सवाल बच्चू कडूंनी केला. तसंच “शिंदेंचा गट, भाजपचा गट यामध्ये आमच्या दोघांचा लहानसा प्रहार आहे. आम्हाला काय आता? मी तर मागेही म्हणालो होतो. आता नाही तर अडीच वर्षांनंतर मंत्रीपद मिळेल”, असंही बच्चू कडू म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये