एक पाऊल मागे! ‘या’ कारणामुळे मी मंत्रिपदाचा दावा सोडतोय…; बच्चू कडूंनी जाहीर केली भूमिका
Bachchu Kadu on Ministry : मी मंत्रिपदावरचा दावा सोडला असून आम्हाला अपंग मंत्रालय दिल्यामुळे हा दावा सोडण्यात आला आहे. पण आगामी काळात लोकसभेसाठी प्रहार युतीमध्ये वाटा मागणार आहे असं प्रहारचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी सांगितलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्या मध्यमातून भाजपसोबत एकत्र येण्याची सुरुवात झाली आहे. तुम्ही भाजप आणि पंतप्रधान मोदींचे मित्र बनला आहेत, असं म्हणायचं? असं विचारल्यावर बच्चू कडू म्हणाले की, आम्ही मित्राचा मित्र आहे. आम्ही थेट मित्र नाही, तर मित्राचे मित्र आहोत, असं बच्चू कडू म्हणाले आहे.
आम्ही आगामी काळात एनडीएसोबत आहोत असं नाही. सर्वात आधी एक बैठक होईल. बैढकीनंतर काय निष्कर्ष लागतो, हे पाहिलं जाईल. आता फक्त बैठकीला आमंत्रित केलं आहे, आता या बैठकीत काय घडतंय त्यानुसार आम्ही निर्णय घेऊ, असं बच्चू कडू म्हणाले. आपल्या आमंत्रण दिल्यामुळे आम्ही इथे आलो आहोत.
त्यामुळे सोबत राहायचं म्हटलं तर कसं राहायचं? कुठल्या गोष्टी घेऊन सोबत राहायचं? या सर्व गोष्टींचा निर्णय अद्याप दूर आहे. आता फक्त आम्हाला आमंकत्रित केलं म्हणून आलोय, असंही बच्चू कडू म्हणाले आहेत.