Top 5ताज्या बातम्यादेश - विदेश

ओडिशात झालेल्या रेल्वे अपघाताबाबत बागेश्वर बाबाला अगोदरच माहिती मिळाली होती ?

Odisha Train Accident : ओडिशात बालासोरमध्ये झालेल्या ट्रेनच्या भीषण अपघाताने (Balasor Train Accident) संपूर्ण देश हादरून निघाला आहे. २८० प्रवाशांचा मृत्यू या दुर्घटनेत झाला तर ११०० हून अधिक जण जखमी झाले. सर्व क्षेत्रातून या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, हा अपघात टाळता आला असता का? या प्रश्नावर देखील अनेकदा चर्चा होताना दिसल्या. मात्र आता एक नवीनच दावा समोर आला आहे. तो म्हणजे बागेश्वर बाबा यांना या घटनेची पूर्वकल्पना होती अशी माहिती समोर येत आहे.

बागेश्वर धामचे बागेश्वर बाबा म्हणजे पंडित धीरेंद्र शास्त्री (Bageshwar Baba Pandit Dhirendra Shastri) यांनी स्वतःच एक दावा केला आहे. बागेश्वर बाबा (Bageshwar Baba) यांना अशा अपघातांची आपल्याला अगोदरच माहिती मिळते का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तराने चर्चांना उधान आले आहे. “अशा प्रकारच्या घटनांबाबत आधीच संकेत मिळत असतात. मात्र, माहिती मिळणे आणि घटना टाळता येणे यात खूप फरक आहे. श्रीकृष्णाला महाभारत होणार याबाबत माहिती होती. मात्र, ते टाळू शकले का?” असे उत्तर त्यांनी दिले.

“आम्ही दररोज देशाच्या आणि जगाच्या कल्याणासाठी परमेश्वराला प्रार्थना करत असतो. अशा प्रकारचा अपघात पुन्हा कधी होऊ नये आणि जखमी लवकर बरे व्हावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.” अशी प्रार्थना देखील त्यांनी यावेळी केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये