ताज्या बातम्यादेश - विदेशमनोरंजनमहाराष्ट्र

अभिनेत्री अमिषा पटेलला ‘ते’ प्रकरण पडलं महागात; कोर्टाकडून वारंट जारी

मुंबई : प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री अमिषा पटेल विरोधात कोर्टाकडून वारंट जारी करण्यात आलं आहे. कोर्टाच्या सुनावणीच्या वेळी उपस्थित न राहिल्यामुळे मुरादाबाद मधील एसीजेएम-५ च्या कोर्टानं अमिषा विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. त्यामुळं अमिषाला मोठा धक्का बसला आहे. २० जुलैला अमिषाला कोर्टात हजर रहावं लागणार आहे.

अमिषा पटेल आणि तिचे सहकारी यांनी ११ लाख रुपये ऍडव्हान्स घेऊन देखील ते कार्यक्रमाला उपस्थित राहिले नसल्याच्या आरोपाखाली मुरादाबाद कोर्टात खटला दाखल करण्यात आलेला आहे. कलम १२० बी, ४०६, ५०४, आणि ५०६ अंतर्गत आमिषावर गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे.

एका लग्नसमारंभात डान्स करण्यासाठी अमिषाला निमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र, ११ लाख रुपये ऍडव्हान्स घेतलेले असून देखील उपस्थित न राहिल्याच्या आरोपात अमिषा आणि तिच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या ड्रीम व्हिजन इव्हेंट कंपनीचे मालक पवन कुमार यांनी अमिषा विरोधात कोर्टात धाव घेतली आहे. ऍडव्हान्स पेमेंट सोबतच अमिषाच्या मुंबई – दिल्ली प्रवासाचा खर्च आणि फाईव्ह स्टार हॉटेलची सोय देखील करण्यात आली होती. त्यामुळे आपले मोठे नुकसान झाले असल्याचा कुमार वर्मा यांनी दावा केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये