ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

ठाकरेंवर आरोप करणाऱ्या, राहुल शेवाळेंचे तरुणीची किस घेतानाचे जुने व्हिडीओ व्हायरल…

मुंबई : (Rahul Shewale On Aaditya Thackeray) अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushantsingh Rajput)आणि दिशा सालियन (Disha Salian) मृत्यू प्रकरणात सीबीआयनं (CBI) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना काही दिवसांपूर्वीच क्विनचीट दिली. मात्र या प्रकरणावरून शिंदे गटाचे नेते आणि खासदार राहुल शेवाळेंनी (Rahul Shewale) आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं.

दरम्यान, शेवाळेंनी बुधवारी दि. 21 रोजी लोकसभेत आणि त्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरेंवर गंभीर आरोप केले. शेवाळेंच्या टीकेला शिवसेनेकडून जुने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करत जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. राहुल शेवाळे यांनी केलेले आरोप संसदेच्या कामकाजातून काढून टाकण्यात आले. त्यानंतर शेवाळेंच्या आरोपांचा शिवसेना खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) जोरदार समाचार घेतला आहे.

‘राहुल शेवाळेंनी केलेल्या आरोपांना शुद्ध मराठी भाषेत हलकटपणा आणि नीचपणा आहे,’ अशा शब्दांत राऊत यांनी शेवाळेंचा समाचार घेतला. तर दुसऱ्या बाजूला राहुल शेवाळेंवर जुलैमध्ये बलात्काराचे आरोप झाले. त्यांची तक्रार एका तरुणीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे (Eknath Shinde) केली होती. यानंतर शेवाळेंनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यावेळी शेवाळेंचे काही व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यात शेवाळे तरुणीला किस करताना दिसत होते. आता शेवाळेंनी आदित्य ठाकरेंवर टीका करताच जुने व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल झाले आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरेंवर आरोप करणारे शेवाळे स्वःताच अडचणीत सापडले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये