ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“बाळासाहेबांच्या तालमीत वाढलेल्या नेत्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली अन्…”; मनसे नेत्याने दिवसा तारे दाखवले

मुंबई : (Bala Nandgaonkar On Chhagan Bhujbal) ट्रक ड्रायव्हर, पानटपरीवाला, चहा विकणारा, भाजी विकणारा, पंक्चर काढणारा इथपासून बड्या उद्योजकांसह अनेकांना शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंनी राजकारणात आणलं… त्यांना आमदार, खासदार अगदी मंत्रीही केलं… पण, बाळासाहेबांच्या शब्दांवर, ताकदीवर अनेकांनी मोठं राजकारण उभं केलं आणि आपली छोटेखानी संस्थानंही थाटल्या… पण राजकारणातलं वाढलेलं प्रस्थ आणि राजकारणातून सत्ता, सत्तेतून पैसा मिळवण्याच्या हव्यासापोटी बाळासाहेबांच्या तालमीत वाढलेल्या नेत्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली आणि पक्ष संघटनेसोबतच दोन हात करण्याचे धाडस दाखवले.

ज्यांना आपण मोठे केले त्यांनीच दगा दिला हे डोळ्यांदेखत घडत असताना बाळासाहेब ठाकरेंनीही अशा नेत्यांना धडा शिकवण्याची एकही संधी सोडली नाही. बाळासाहेबांचे बोट धरून मुंबई महापालिकेच्या महापौर पदापासून महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्रिपदापासून उपमुख्यमंत्रिपद मिळावलेल्या आणि आज घडीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोडून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बंडात सहभागी झालेल्या छगन भुजबळांना बाळासाहेबांच्या आदेशावरून शिवसैनिकांनी अद्दल घडवली होती. या निमित्तानं गद्दारांना गाडण्यासाठी बाळासाहेबांनी अगदी दगडालाही उमेदवारी दिली तरी त्याला विजयी करण्यासाठी शिवसैनिकांनी जंग जंग पछाडल्याचा इतिहास डोळ्यांसमोर येतो.

शिवसेनेतील महत्त्वाची सर्व पदं, मुंबईचे महापौरपद मिळूनही छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली होती. याद्वारे त्यांनी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाच आव्हान दिलं होतं…. काही आमदारांनाही त्यांनी सोबत नेलं होतं. भुजबळांची ही कृती बाळासाहेबांसह शिवसैनिकांच्या जिव्हारी लागली होती. शिवसैनिक संधीच्या शोधात होते. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ती संधी चालून आली होती. मंबईतील माझगाव विधानसभा मतदारसंघात बाळा नांदगावकर यांच्यासारख्या शिवसेनेच्या अगदी नवख्या उमेदवाराला विजयी करून शिवसैनिकांनी काँग्रेसमध्ये गेलेल्या छगन भुजबळ यांचा धक्कादायक पराभव केला होता. शिवसैनिक गद्दारी सहन करू शकत नाहीत, असा संदेश त्याद्वारे देण्यात आला होता.

उपेक्षित, रस्त्यावरच्या अनेक तरुणांना उचलून बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारणात मोठं केलं. आमदार, खासदार, अगदी मंत्रीही केलं. सत्तेची पदे भोगून बाहेर पडलेल्यांना मात्र शिवसेना आणि शिवसैनिकांनी जबर धडा शिकवला. शिवसेनेच्या भाषेत अशा लोकांना गद्दार असं संबोधलं जातं….. अशांना धडा शिकवण्यासाठी मग पक्षानं अगदी दगडालाही उमेदवारी दिली तरी त्याला विजयी करण्यासाठी शिवसैनिकांनी जंगजंग पछाडल्याचं दिसतं…..

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये