बांग्लादेश समोर १८५ धावांचं आव्हान; भारताची बाजू मजबूत
ICC WORLD CUP 2022 : आयसीसी टी २० वर्ल्डकप २०२२ च्या भारत विरुद्ध बांग्लादेश सामन्यात भारतीय संघाने आज जबरदस्त कामगिरी केली आहे. भारतीय संघाने बांग्लादेश संघासमोर १८५ धावांचे आव्हान ठेवले आहे. बांग्लादेशने टाॅस जिंकून गोलंदाजी घेतली होती. दरम्यान, विराट कोहलीने आपला फॉम कायम ठेवलेला दिसला. ४४ धावांमध्ये ६४ धावा घेत त्याने आघाडीवर राहिला. तर, मागील काही सामन्यात आपली कामगिरी दाखवण्यास कमी पडलेला के एल राहुल आज चांगलाच जोमात दिसला. ३२ चेंडूत मध्ये त्याने अर्धशतक पूर्ण केले.
दरम्यान, रोहित शर्मा २ धावा काढून बाध झाला. सुर्याकुमार यादव 30 धावा, हार्दिक पंड्या ५ धावा, दिनेश कार्तिक ७ धावा, पटेल ७ धावा, आर अश्विन १३ धावा काढण तबल १८5 धावांचा डोंगर बांगलादेश समोर भारतीय संघाने उभा केला आहे. त्यामुळे भारताची बाजू सध्या मजबूत दिसत आहे.