अखेर राज्यपालांची कबुली; ‘माझ्यासाठी हे पद अयोग्यच…’
मुंबई : (Bhagat Singh Koshyari)नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत राहणारे महाराष्ट्राचे राज्यपाल (Maharashtra Governor) भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) आज आणखी वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, राज्यपाल बनणं म्हणजे दुःखच दुःख आहे, यात कोणतेही सुख नाही. हे पद माझ्यासाठी योग्य नाही. अशी खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली. त्यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.
राज्यपाल कोश्यारी अनेक वेळा महापुरुषांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे टीकेचे धनी बनले आहेत. सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्यावर खूप खालच्या शब्दात त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण तपलं होतं. विरोधकांनी तर त्यांना पदावरुन हटण्याची मागणी केली होती. याच पार्श्वभुमीवर त्यांनी आपल्या मनातील राज्यपाल पदाबाबतची खंत व्यक्त केली आहे.
दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांच्यावरील टीकेचा वाद आणखीन शमला नसतानाच त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी ते खंत व्यक्त करताना म्हणाले, “कधी कधी मला असं वाटतं की, मी चुकीच्या ठिकाणी आलो आहे. परंतू मी 80 वर्षांचा झालो, त्यामुळे मी आता मुमुक्षरत्न नाही बनू शकत. मात्र, जेव्हा सन्यांसी आणि मुमुक्षरत्न राजभवनात येतात, तेव्हा मला आनंद होतो”, अशी प्रतिक्रिया राज्यपाल कोश्यारी यांनी आज माध्यमांना दिली आहे. त्यामुळे कोश्यारींना देखील राज्यपाल पदावरुन मुक्त होयचे आहे का? हा प्रश्न यानिमित्ताने समोर येत आहे. ते राजभवन येथे आयोजित कार्यक्रमात जैन समाजाला संबोधित करताना बोलत होते.