Top 5ताज्या बातम्यादेश - विदेशपुणेमहाराष्ट्ररणधुमाळी

बिनविरोधाची परंपरा कायम राहणार का?

विजय कुलकर्णी
पुणे : एखाद्या मतदार संघात विद्यमान आमदार, खासदारचे निधन झाले तर त्या ठिकाणी शक्यतो निवडणूक बिनविरोध करायची असा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्षांचा पायंडा आहे. मागील अनेक वर्षांपासून सुरु असलेली ही परंपरा अपवाद वगळता कायम ठेवण्यात आली आहे. मात्र, अलीकडील काही वर्षांमध्ये राजकीय मंडळी आणि पक्षांच्या महत्त्वाकांक्षा वाढल्याने परस्परांविरोधात निवडणूक अर्ज दाखल केले जातात. (Kasba peth Mukta Tilak, Pimpri Chinchwad Laxman Jagtap)

परंपरा पाहता शक्यता ज्या आमदाराचे निधन झाले आहे त्या आमदाराच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तिला उमेदवारी दिली जाते. सदर व्यक्तीप्रती आदर म्हणून विरोधीपक्ष उमेदवार देत नाहीत. त्यामुळे आता कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड विधानसभेमध्ये ही परंपरा पाळली जाणार का? हे उत्सुकतेचे राहणार आहे. परंतु काही या परंपरेला छेद देत नोव्हेंबर २०२० तत्कालीन आमदार कै.भारत भालके यांचे निधन झाले. एप्रिल २०२१ मध्ये पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर कै. भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली. तर भाजपाने मंगळवेढ्याचे सुपुत्र समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली. चुरशीच्या निवडणुकीमध्ये भगीरथ भालके यांना १ लाख ५ हजार मते मिळाली. तर समाधान आवताडे यांना १ लाख ८५०० मते मिळाली. ३ हजार ५०० हून अधिक मताधिक्याने आवताडे विजयी झाले.

त्यानंतर शिवसेना ११ मे २०२२ आमदार रमेश लटके (उद्धव ठाकरे गट) यांचे अकाली निधन झाले. या रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व जागेवर ६ नोव्हेंबर २०२२ ला पोटनिवडणूक झाली. यामध्ये दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके निवडून आल्या. या निवडणुकीमध्ये सुद्धा अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले. या निवडणुकीत प्रमुख पक्षांनी लढतीत भाग घेतला नाही. काही अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरल्याने निवडणुकीचे सोपस्कार पार पाडावे लागले. या अंधेरी पूर्व विधानसभेसाठी भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली होती. मात्र, ऐनवेळी भाजपाने उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांच्या निवडीचा मार्ग सोपा झाला. १८ जानेवारी २०२३ बुधवारी पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकांसाठी तारीख जाहीर झाल्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आले. या दोन्ही जागांवर दिवंगत आमदारंच्या कुटूंबिंयापैकी एकाला भाजपा उमेदवारी देणार का? यावरच पुढील निवडुकीचा रागरंग अवलंबून असणार आहे.

येत्या २७ फेब्रुवारी २०२३ रोजी या दोन्ही जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर २ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. राज्यातील महापालिकेवर सध्या प्रशासक नेमले आहे. या प्रशासकला जवळ जवळ एक वर्ष होत आले तरी महापालिकेची निवडणूक कधी होणार? याकडे इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे. भाजपच्या पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने विधानसभेच्या या जागा रिक्त झाल्या आहेत. या जागेवर पोटनिवडणूक कधी लागणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. अखेर निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली.

आगामी महापालिकेच्या दृष्टीने या दोन्ही पोटनिवडणुका प्रतिष्ठेच्या ठरणार आहेत. कसबा विधानसभेची उमेदवारी जर टिळक कुटूंबात आणि चिंचवड विधानसभेची उमेदवारी जर जगताप कुटूंबात दिली तर ही निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आता राजकीय क्षेत्रात चर्चीली जावू लागली आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय प्रथा, परंपरा यानुसार ही निवडणूक बिनविरोध होणार की सत्ताधारी विरुद्ध विरोधक आणि अपक्ष असा सामना रंगणार याबाबत राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये