भूमी पेडणेकरच्या डीप नेक ब्लाउजमुळे चाहते संतापले; म्हणाले, अशा बोल्ड लुकमध्ये भूमी…

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) तिच्या इतर चित्रपटांव्यतिरिक्त ‘दम लगा के हैशा’, ‘टॉयलेट: अ लव्ह स्टोरी’ आणि ‘सोनचिरिया’ मधील तिच्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. भूमी आता तिच्या सौंदऱ्याने लोकांना भुरळ घालते आहे. नुकतेच लग्न झालेल्या सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीच्या रिसेप्शनमध्ये तिने अतिशय सुंदर घागर आणि ब्लाउज परिधान केला होता. मात्र तिच्या नेक ब्लाउजमुळे नेटकऱ्यांनी तिला सोशल मीडियावर चांगलच ट्रोल केलं आहे.

भूमी पेडणेकरने नुकतीच सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीच्या रिसेप्शनला हजेरी लावली.

रिसेप्शनसाठी भूमीने नेक ब्लाउज आणि घागरा परिधान केला होता. त्या ड्रेसमुळे भूमी ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

भूमीने डीप नेक ब्लाउज आणि घागरा परिधान केला होता. एका युजर्सने म्हटलं आहे की, अशा बोल्ड लुकमध्ये भूमी खूपच विचित्र दिसत आहे.

भूमीने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अटाऊंटवर शेअर केले आहेत.