क्राईमताज्या बातम्यापुणे

कधी स्पा सेंटर तर कधी पंचतारांकीत हॉटेल; पुण्यात आणखी एका सेक्स रॅकेटवर कारवाई

पुणे | पुणे शहर आणि परीसरात वेश्या व्यवसाय अनेक ठिकाणी सुरु आहे. कधी पोलीस स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसाय उघड करतात तर कधी पंचतारांकीत हॉटेलमधील सेक्स रॅकेटवर कारवाई केली जाते. गेल्या काही महिन्यात वेश्या व्यवसायाचे अनेक प्रकार पोलिसांनी उघड केले आहे. अशातच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पुण्यातील वाकड परिसरातील पंचतारांकित हॉटेल्समधून चालणाऱ्या एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

शुक्रवारी सायंकाळी उशिरा गुन्हे शाखेने तेथे छापा टाकला. या छाप्यादरम्यान उघड झाले की, भोजपुरी अभिनेत्रीला आणि एका मॉडेलला या व्यवसायात वेगवेगळे बहाणे करून आणण्यात तिघांचा हात आहे. छाप्यादरम्यान अभिनेत्री आणि मॉडेलची सुटका करण्यात आली. या तिघांनीच त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले होते. या बाबत माहिती मिळताच पोलिसांनी आधी या गोष्टीची खातरजमा केली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या गुप्तचरांनी डमी ग्राहकाची नियुक्ती केली. या डमी ग्राहकांनी त्याच्या एजंट-हँडलरशी ऑनलाइन संपर्क साधला. त्यानंतर मग नंतर अभिनेत्री-मॉडेलचे फोटो शेअर केले आणि हॉटेलच्या खोल्याही बुक केल्या गेल्या.

याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. प्रबीर पी. मजुमदार, दिनेश यादव आणि विराज यादव अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यांनीच दोन महिलांना मोठ्या रकमेचे आश्वासन देऊन वेश्याव्यवसायाच्या रॅकेटमध्ये अडकवले होते. आता या रॅकेटचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचले आहे. हे जाळे कुठपर्यंत पसरले आहे तसेच ग्लॅमर इंडस्ट्रीतील इतर महिलांचाही यात सहभाग आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. त्याच प्रमाणे पिंपरी-चिंचवड आणि इतर आसपासच्या भागात वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या लोकांचा तपासही पोलिसांनी सुरू केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये