ताज्या बातम्यामनोरंजन

Bigg Boss 16 Winner : ‘एमसी स्टॅन’च्या नावे ‘बिग बॉस 16’ ची ट्रॉफी

Bigg Boss 16 Winner : ‘बिग बॉस 16’ चा ग्रैंड फिनाले धमाक्यात पार पडला. रात्री 12 च्या ठोक्याला विजेत्याच्या नावाची घोषणा झाली आणि सेटवर एकच जल्लोष झाला. तरूणाईला आपल्या म्युजीकने वेड लावणारा एमसी स्टॅन बिग बॉसच्या 16व्या सीझनचा विजेता ठरला. तर शिव ठाकरे उपविजेता ठरला आहे. अखेरच्या क्षणाला शालीन भनोट आणि अर्चना हे दोघं बाद झालेत आणि प्रियंका, शिव व एमसी स्टॅन असे टॉप 3 फिनाले रेसमध्ये उरले.

या तिघांमधून ‘बिग बॉस 16 चा विजेता कोण होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना प्रियंकाही बाद झाली आणि शिव व एमसी स्टॅन असे टॉप 2 स्पर्धक विजेतेपदाच्या शर्यतीत उरले. यापैकी कोण जिंकणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना सलमानने एमसीच्या नावाची घोषणा केली. एमसीला बिग बॉसची ट्रॉफी सोपवण्यात आली.

‘बिग बॉस 16’ची ट्रॉफी जिंकल्यानंतर एमसीने चाहत्यांचे मनापासून आभार मानलेत. सलमानने त्याला बिग बॉस 16 व्या सीझनची ट्रॉफी सोपवली. त्यासोबत 31 लाख 80 हजार रोख रकमेचा धनादेशही सुपूर्द केला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये