ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी

“दारू प्राशन केल्यानं मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देणार नाही”, बिहारच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

पटना | CM Nitish Kumar – बिहारचे (Bihar) मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांनी मोठी घोषणा केली आहे. विषारी दारू प्राशन केल्यानं बिहारमध्ये 53 जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत नितीश कुमार यांनी मोठं वक्तव्य केलं. “दारु प्राशन केल्यानं मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही भरपाई दिली जाणार नाही. आम्ही नेहमीच मद्यप्राशन करु नका, मृत्यू होईल असं आवाहन करत आहोत. मद्यप्राशनाच्या बाजूनं बोलणारे तुमचं काही भलं करु शकत नाहीत,” असं नितीश कुमार यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ‘जे लोक बनावट दारू पितात, त्यांचा मृत्यू होणारच’ (जो पियेगा, वो मरेगा!) असं विधान केलं आहे. नितीश कुमार यांच्या वक्तव्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मात्र, नितीश कुमार आपल्या भूमिकेवर ठाम असून ही माझी वैयक्तिक इच्छा नसून राज्यातील महिलांच्या आक्रोशाला प्रतिसाद आहे, असं त्यांनी सांगितलं.

नितीश कुमार यांच्या दारू धोरणावर भाजपसह अन्य पक्षांनी जोरदार टीका केली आहे. तसंच विरोधी पक्षांनी सलग दुसऱ्या दिवशी विधानसभेत गोंधळ घातला. तर बिहारमधील महाआघाडी सरकारला पाठिंबा देणाऱ्या सीपीआय (एमएल) लिबरेशननं पुनरावलोकनाची मागणी करत कामकाज सुरू होण्यापूर्वी सभागृहाबाहेर निदर्शने केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये