ताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज ठाकरेंच्या सभेनंतर भाजपकडून उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्षपणे युतीची ऑफर? पाहा विधान परिषदेत काय घडले

मुंबई | सध्या विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) हे आज समोरासमोर आले. युती तोडल्यावरून सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला तर उद्धव ठाकरे यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं. मात्र याचवेळी बोलताना मुनगंटीवार यांनी ‘उद्धवजी पुन्हा एकदा शांततेनं विचार करा, झाड वाढवायचा विचार करा’ असं म्हणत ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे युतीची ऑफरच दिल्याचं म्हटलं जात आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. उद्धवजी मी भेटून तुम्हाला स्वतः सांगायचो फळ येतील पण तुम्ही झाडाशी नातं तोडलं. तुम्ही झाडाशी नातं तोडलं त्याला आता मी काय करणार? मी येवून व्यक्तीगत सांगायचो की या झाडाला कोणतं खत पाहिजे, मात्र तुम्ही ते खत न टाकता दुसरंच खत टाकलं. मी एकदा नाही तीनदा विनंती केली. आजही वेळ गेलेली नाही शांततेत विचार करा, झाड वाढवायचा विचार करा असं मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांना म्हटलं होत.

यावर उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर देत तुम्ही खताऐवजी निर्मा टाकल्याचं म्हटलं आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कालच्या भाषणावरून मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे. गेल्या 18 वर्षापासून ते घासले, पुसलेले भाषण होते. मी माझी भूमिका मांडली आहे. स्क्रिप्ट आली त्यानुसार बोलले असणार आणि रातोरात कारवाई झाली. राज्यात इतरही अनेक अनधिकृत गोष्टी आहेत त्यांच्याकडे माहिती असेल तर त्यांनी पत्र द्यावे, असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये