राज्यपाल कोश्यारींना शांत बसा, बोलू नका! असे ‘वरुन’ आदेश!
नवी दिल्ली : (BJP Senior On Bhagat Singh Koshyari) आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी परिचित असलेले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नुकतेच मुंबईविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. यामुळे भाजपला अनेकवेळा तोंडावर पडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कोश्यारी यांना सक्तीचे मौन बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सध्या दिल्लीत असून महाराष्ट्र सदनात ‘हर घर तिरंगा’ या अभियानाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला आहे.
दरम्यान, यावेळी प्रसारमाध्यमांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, माध्यमांचे कॅमेरे दिसताच कोश्यारींनी पाठ फिरवत तेथून काढता पाय घेतला. मात्र, येथून निघण्यापूर्वी राज्यपाल कोश्यारी यांनी प्रसारमाध्यमांशी दोन-चार मोघम वाक्य बोलली. ते म्हणाले, मी बोलणार माध्यनांशी नसून इथे मुख्यमंत्री आहेत, तुम्ही त्यांच्याशी बोला असे कोश्यारींनी म्हटलं आहे.
राज्यपालांचे यांचे हे वक्तव्य पाहता भाजप पक्षश्रेष्ठींनी त्यांना न बोलण्याची सक्त ताकीद देण्यात आल्याचे दिसत आहे. मात्र, राज्यपाल हे घटनात्मक पद असल्याने त्यांना अशाप्रकारे बोलण्यास कोणी मनाई करू शकते का? या प्रश्नावरून आता वाद निर्माण होऊ शकतो. आता राज्याच्या राजकारणाला नवे वळण मिळणार का हे पहाणे महत्त्वाचे आहे.