ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

नागपूरात भाजपला भोपळा, बालेकिल्ल्यातच सुपडा साफ; किंगमेकर फडणवीसांना काॅंग्रेसकडून धोबीपछाड!

नागपूर : (BJP’s defeat in Panchayat Samiti Chairman election in Nagpur) राज्यात सत्तांतर घडवून भाजपने काही महिन्यांपूर्वी महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला. मात्र याच भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर जिल्ह्यात मात्र काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपला धोबीपछाड देत काँग्रेसने तब्बल ९ जागांवर विजय मिळवलं आहे. भाजपला मात्र खातंही उघडता आलं नाही.

भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे पालकमंत्रीही आहेत. तसंच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेदेखील याच नागपूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतात. राज्य पातळीवरील दोन मोठ्या नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपला पराभवाचा धक्का बसल्याने मोठी चर्चा रंगत आहे.

दरम्यान, नागपूर जिल्ह्यात भाजपला केवळ २ तालुक्यांमध्ये उपसभापतीपदावर समाधान मानवं लागलं आहे. पक्षातील दिग्गज नेते ज्या नागपूर जिल्ह्यातून येतात त्याच जिल्ह्यात सभापतीपद निवडणुकीत भाजपची दारूण अवस्था झाल्याने राज्यभर हा चर्चेचा विषय ठरला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये