‘हे’ आहेत बॉलिवूडचे सुपरहिट ठरलेले फीमेल-लीड चित्रपट, बॉक्स ऑफिसवर केलीये रेकॉर्ड ब्रेक कमाई
एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूडमध्ये (Bollywood) पुरूषप्रधान चित्रपटांची चलती मोठ्या प्रमाणात होती. त्यावेळी नायिकाप्रधान चित्रपट जास्त पाहायला मिळत नव्हते. पण आता तशी परिस्थिती नाहीये. आता पुरूषप्रधान चित्रपटांसोबतच नायिकाप्रधान चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहेत. अनेक दिग्दर्शकांनी नायिकाप्रधान चित्रपटांची निर्मिती करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तसंच या चित्रपटांमधून काही अभिनेत्री चांगल्याच प्रसिद्धीझोतात आल्या आहेत. तर आता आपण काही अशा अभिनेत्री आणि त्यांच्या नायिकाप्रधान चित्रपटांबाबत जाणून घेणार आहोत ज्यांनी पुरूषप्रधान चित्रपटांना मागे टाकत बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड मोड कमाई केली आहे.
क्वीन (Queen) – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौतचा ‘क्वीन’ हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. हा चित्रपट प्रेक्षक अजूनही तितक्याच आवडीनं पाहतात. कंगनाच्या या नायिकाप्रधान चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. 2013 ला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट एक स्त्री, तिचं स्वातंत्र्य, मैत्री, प्रेम या गोष्टींवर आधारित आहे. या चित्रपटातून कंगना चांगलीच प्रसिद्धीझोतात आली. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटानं तब्बल 97 कोटींची कमाई केली आहे.
राझी (Raazi) – ‘राझी’ हा चित्रपट 2018 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. या चित्रपटानं 122 कोटी रूपयांची कमाई केली होती. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्री आलिय भट्टनं मुख्य भूमिका साकारली दमदार अशी कामगिरी केली आहे. यामध्ये आलियानं सेहमत नावाच्या गुप्तहेराची भूमिका साकारली होती. राझी या नायिकाप्रधान चित्रपटाचं दिग्दर्शन दिग्दर्शक मेघना गुलजार यांनी केलं आहे. तसंच या चित्रपटात आलियासोबत अभिनेता विकी कौशलही महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता.
नीरजा (Neerja) – प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक असलेल्या सोनम कपूरचा ‘नीरजा’ हा चित्रपट देखील सुपरहिट ठरला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत तब्बल 135 कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. नीरजा भानोत यांच्या कथेशी संबंधित असणाऱ्या या चित्रपटात नीरजा या एक एअर होस्टेस होत्या ज्यांनी फ्लाइटमध्ये अपहरण झालेल्या मुलांचा जीव वाचवताना आपला जीव गमावला होता. हा एक थ्रीलर असा चित्रपट आहे.
गंगुबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) – आलिया भट्टचा आणखी एक सुपरहिट ठरलेला चित्रपट म्हणजे ‘गंगुबाई काठियावाडी’. या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता. या चित्रपटानं देखील बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. हा चित्रपट एका तरूण मुलीवर आधारीत आहे जिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडलं जातं. तिच्या खडतर आयुष्याचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. या चित्रपटानं 210 कोटींची कमाई केली आहे.