ताज्या बातम्यादेश - विदेश

‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ला बॉम्बने उडवण्याची धमकी; रशियन भाषेतील ई-मेलने खळबळ

देशातील शाळांना आणि संस्थांना मिळणाऱ्या धमकीचे कॉल्स आणि ई-मेल्सचा येण्याचे सत्र थांबेनासे झाले आहे. एअरलाइन्स आणि शाळांनंतर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा मेल आला आहे. या मेलमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला स्फोटकांनी उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. आरबीआय अधिकाऱ्यांच्या मेल आयडीवर रशियन भाषेतील ई-मेल आला आहे. मेल मिळाल्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले असून त्यांनी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात मेल पाठवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सध्या तपास सुरू आहे.

मागील महिन्यातही मिळाली धमकी

या आधीही नोव्हेंबरमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) कस्टमर केअर विभागाला धमकीचा फोन आला होता. हा कॉल रिझर्व्ह बँकेच्या कस्टमर केअर नंबरवर सकाळी 10 वाजता करण्यात आला होता, फोनवर उपस्थित असलेल्या व्यक्तीने आपण लष्कर-ए-तैयबाचे सीईओ असल्याचे सांगितले होते. धमकी देणाऱ्या व्यक्तीने मागचा रस्ता बंद करा, इलेक्ट्रिक कार खराब झाली आहे असे सांगून फोन बंद केला होता. आज दिल्लीतील 16 शाळांनाही अशीच धमकी मिळाली होती. ही धमकी ई-मेलद्वारे मिळाली असून त्यात शाळा स्फोटकांनी उडवल्या जातील, असे म्हटले आहे. दिल्ली पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये