ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

ब्राह्मण महासंघाच्या मागणीला यश आल्यावर! देवेंद्र फडणवीस होणार पुण्याचे खासदार?

पुणे : (Brahman Mahasangh On Devendra Fadnavis) आज अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून उमेदवारी देऊन खासदार करावे, अशी मागणी केली आहे. या मागणीमुळे पुण्यातील अनेक नेत्यांच्या भूवया उंचावल्या आहेत. पुण्यात अखिल भारतीय महासंघ भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. 2024 मध्येही देवेंद्र फडणवीस यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असं महासंघाकडून सांगण्यात आलं आहे.

पक्षश्रेष्ठीने केलेली फडणवीस यांची निवड अत्यंत महत्त्वाची आहे. यामुळे फडणवीस यांनी दिल्लीतील राजकारणाची सुरुवात पुण्यातून करावी, अशी इच्छाही महासंघाने पत्रात व्यक्त केली आहे. राज्यात एकनाथ शिंदे यांचे सरकार आल्यानंतर पुण्याचे पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव चर्चेत आहे. फडणवीस पालकमंत्री झाल्यास जिल्ह्याचे अनेक प्रश्न मार्गी लागतील, त्यामुळे ते जिल्ह्याच्या हिताचे असल्याचे बोलले जात आहे.

मात्र पालकमंत्र्यांचा निर्णय झालेला नाही. त्याचवेळी ब्राह्मण महासंघाने फडणवीस यांना पुण्याचे खासदार म्हणून पत्र दिल्याने फडणवीस यांच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे. यावर भाजप नेते काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे. उद्या पुण्यातील ब्राह्मण महासंघाचे नेते आणि कार्यकर्ते भाजप नेते चंद्रकांत पाटील यांची पुण्यातील घरी जाऊन भेट घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये