देश - विदेश

‘ब्रह्मास्त्र’ मधील अभिनेत्याचे कपिल शर्मावर गंभीर आरोप; म्हणाला, “तू लोकांना हसवतोस, पण तू अन् तुझी टीम…”

मुंबई | Saurav Gurjar On Kapil Sharma – सुप्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माचा (Kapil Sharma) ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) चांगलाच लोकप्रिय आहे. कपिल त्याच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांना नेहमी हसवतो. तसंच तो अनेकदा वादाच्या वादाच्या भोवऱ्यातही अडकला आहे. अशातच ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) चित्रपटामधील एका अभिनेत्यानं कपिल शर्मा आणि त्याच्या टीमवर गंभीर आरोप केले आहेत. ट्विटद्वारे या अभिनेत्यानं कपिल शर्मावर आरोप केले आहेत.

कपिल शर्मा त्याच्या शोमध्ये ‘पोस्ट का पोस्टमार्टम’ नावाचं एक सेगमेंट चालवतो. या सेगमेंटमध्ये सेलिब्रिटींच्या पोस्टला नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट्स वाचून दाखवल्या जातात. तसंच नुकतीच बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूरनं (Ranbir Kapoor) द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. ‘तू झूठी मैं मक्कार’ (Tu Jhoothi Main Makkaar) या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रणबीर या शोमध्ये गेला होता. यावेळी ‘पोस्ट का पोस्टमार्टम’ या सेगमेंट दरम्यान रणबीर आणि अभिनेता सौरव गुर्जर (Saurav Gurjar) यांच्या फोटोवर नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट्स वाचण्यात आल्या. मात्र, या कमेंट्स खोट्या असल्याचा आरोप सौरवनं केला आहे.

ब्रह्मास्त्र चित्रपटामध्ये रणबीर सोबत सौरवनं काम केलं आहे. त्यामुळे त्या दोघांचा फोटो द कपिल शर्मा शोमधील ‘पोस्ट का पोस्टमार्टम’या सेगमेंटमध्ये दाखवण्यात आला. तसंच सौरवनं या सेगमेंटचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘कपिल शर्मा तू एक चांगला माणूस आहेस. तू लोकांना नेहमी हसवतोस, पण तू आणि तुझी टीम कुणाच्या तरी सोशल मीडिया अकाऊंटवरील खोट्या कमेंट्स कशा दाखवता? हे मान्य न करण्यासारखं आहे.’ सौरवनं शेअर केलेल्या या ट्विटनं कपिल शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये