“दूरदर्शन-सह्याद्रीवर हिंदीत नाही राजभाषेत कार्यक्रम प्रसारित करा”; मनसेकडून पत्र

मुंबई : मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसांच्या हितासाठी कायम प्रश्न उपस्थित करणारे मनसे प्रमुख राज ठाकरे पुन्हा एकदा ऍक्टिव झालेले दिसत आहेत. मार्च – एप्रिल महिन्यातील भोंगा प्रकरणानंतर आता पुन्हा एकदा मनसे प्रमुख मराठीकडे वळलेले दिसत आहेत. त्यांनी दूरदर्शन आणि सह्याद्रीवर चालणारे कार्यक्रम मराठीतच चालवावेत अशी विनंती करणारे पत्र दूरदर्शन पश्चिमचे अप्पर महासंचालक नीरज अग्रवाल यांना पाठवले आहे.
दूरदर्शन वाहिनीवर हिंदी भाषेत कार्यक्रम प्रसारित न करता महाराष्ट्राची राजभाषा असलेल्या मराठी भाषेतीलच कार्यक्रम प्रसारित करण्यात यावेत असं लिखित स्वरुपात असलेले पत्र मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संजय चित्रे यांनी प्रसारण भवन येथे भेट देत अग्रवाल यांना दिले आहे. आणि त्यांच्याबरोबर चर्चा देखील केली आहे. मनसे अधिकृतच्या ट्विटर वरून ते पत्र ट्वीट देखील करण्यात आले आहे.