आपल्या अल्पवयीन मुलीचा व्हिडिओ व्हायरल केल्याचा विरोध करणार्या BSF जवानाची तरुणाच्या कुटुंबाकडून हत्या
Gujrat : (BSF Jawan Killed In Gujarat) गुजरात मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या अल्पवयीन मुलीचा तिच्या वर्गातील मुलाने व्हिडिओ व्हायरल केल्याने मुलीच्या वडिलांनी (BSF जवान) मुलाचा विरोध केला. (BSF Man Killed In Gujarat For Protesting Against Daughter’s Video, 7 Arrested) विरोध करण्यासाठी मुलाच्या घरी गेल्यानंतर मुलाच्या घरच्यांनी अक्षरशः BSF जवानाची हत्या केली. दरम्यान, पोलिसांनी मुलाच्या घरातील 7 सदस्यांना ताब्यात घेतले आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. (Seven accused arrested after they killed a BSF soldier Meljibhai Vaghela)
मेलजीभाई वाघेला असे बीएसएफ जवानाचे नाव आहे. तरुणाच्या कुटुंबीयांनी त्याच्यावर लाठ्या आणि धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. वाघेला त्यांचा मुलगा आणि इतर कुटुंबीयांसह शैलेशच्या घरी जाऊन त्यांच्या मुलीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि ऑनलाइन पोस्ट केल्याबद्दल त्यांचा विरोध करत होते.
एफआयआरनुसार, नडियाद तहसीलच्या वानीपुरा गावातील शैलेश उर्फ सुनील जाधव याने वाघेला यांच्या मुलीचा व्हिडिओ बनवला होता. 24 डिसेंबर तो व्हायरल झाला होता. मुलीच्या घरचे मुलाच्या घरी गेल्यानंतर शैलेश घरी नव्हता, त्याच्या कुटुंबातील लोक उपस्थित होते.
BSF जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांवर मुलाच्या कुटुंबातील सात जणांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला ज्यात बीएसएफ जवानाचा मृत्यू झाला तर त्याचा मुलगा नवदीपच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. नवदीपवर अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
One Comment