क्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्र
दिवसाची दुसरी दुर्घटना! मुंबईत बिल्डिंगचा भाग कोसळला; अनेक जण दबल्याची भीती

मुंबई : (Building accident in Mumbai) राज्याच्या अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना समोर येत आहेत. अशातच मुंबईत भाईंदर स्टेशन पूर्व समोरील बिल्डिंगचा भाग कोसळला आहे. यामध्ये अनेक जण दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
घटनास्थळी लोकांची गर्दी जमली आहे. तर या बिल्डिंगचा भाग कोसळला त्याखाली अनेक जण दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुंबईत सलग दोन ते तीन दिवस जोरदार पाऊस सुरु आहे. अशात इमारत खचण्याचा किंवा कोसळण्याचा धोका वाढला आहे.
मीरा- भाईंदर येथे भाईंदर रेल्वे स्थानक (पुर्व), तिकीट खिड़की समोरील इमारतीचा भाग पडला. यामध्ये 1 व्यक्ती अडकून पडला होता. सदर व्यक्तीस बाहेर काढण्यात अग्निशमन दलास यश आले असून शोधकार्य अद्याप सुरू आहे.