इतरक्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्र

रूग्ण तपासण्याच्या बहाण्यानं घरी बोलावलं अन् डॉक्टरला नग्न केलं; पुढे जे झालं ते वाचून तुम्हाला बसेल धक्का

बुलढाणा | Buldhana Crime : बुलढाणा (Buldhana) शहरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. रूग्णाला तपासण्यासाठी डॉक्टरला घरी बोलावलं आणि त्याला शस्त्राचा धाक दाखवत नग्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून आत्तापर्यंत चार जणांना अटक केली आहे.

आरोपींनी शहरातील एका प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञाला रूग्णाला तपासण्यासाठी घरी बोलावले. त्यानंतर डॉक्टरला शस्त्राचा धाक दाखवत नग्न केलं. तसंच त्याचं चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी डॉक्टरकडून तब्बल साडे आठ लाख रूपयांची खंडणी वसूल केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

बुलढाण्यातील चिखली येथे डॉ. सौरभ संचेती यांचं रूग्णालय आहे. तर 12 ऑक्टोबर रोजी सौरभ संचेती यांना त्यांच्या मोबाईलवर एक कॉल आला. कॉलवर एक व्यक्ती म्हणाली की, मी दीक्षांत नवघरे बोलत आहे, माझ्या घरी एक कर्करोगाचा रूग्ण आहे. त्यामुळे तुम्ही रूग्णाला तपासण्यासाठी आमच्या घरी येऊ शकता का? समोरच्या व्यक्तीनं अशी विनंती केल्यानंतर डॉक्टरांनी होकार दिला.

डॉ. सौरभ संचेती हे कॉलवरील व्यक्तीनं सांगितलेल्या पत्त्यावर गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या घरात सहाजण बसले होते. रूग्णाला तपासायचं म्हणून एक व्यक्ती डॉक्टरांना आत घेऊन गेला आणि नंतर बाकीच्या आरोपींसह त्यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर शस्त्राचा धाक दाखवत डॉक्टरला नग्न करण्यात आलं आणि त्यांचं अश्लील चित्रीकरण करण्यात आलं. त्यानंतर हे चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी डॉक्टरला देण्यात आली. तसंच आरोपींनी त्यांना 20 लाखांची खंडणी मागितली. मग डॉक्टरने आपल्या मित्राला फोन करून साडे आठ लाख रूपये मागवले आणि आरोपींना दिले.

18 ऑक्टोबर रोजी एक आरोपी पुन्हा डॉक्टरच्या रूग्णालयात आला आणि तो उर्वरित रक्कम मागू लागला. त्यामुळे डॉक्टरांनी पोलिसात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चार आरोपींना अटक केली. तसंच आता उर्वरीत आरोपींचा शोध पोलीस घेत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये