ताज्या बातम्यारणधुमाळी

‘…पण आधी लगीन कोंढाण्याचं’; राज ठाकरेंच्या ‘उत्तर’ सभेला उपस्थित राहत वसंत मोरेंचं भाष्य

मुंबई : गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे न काढल्यास त्यांच्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावण्याचं आवाहन केलं होतं. तसंच राज ठाकरे यांच्या या भाषणावर अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या. यादरम्यान आज होत असलेल्या उत्तरसभेत या सर्व मुद्द्यांना राज ठाकरे उत्तर देणार आहेत. यामुळे या सभेला ‘उत्तरसभा’ असं नाव मनसेकडून देण्यात आलं आहे. तसंच या सभेत वसंत मोरे यांनी देखील हजेरी लावली असून माझ्या घरचा आज कार्यक्रम आहे. पण आधी लगीन कोंढाण्याचं असं म्हणत भाष्य केलं आहे.

मला निमंत्रणाची गरज नाही. साहेबांनी काल सांगितलं होतं की तू ठाण्याला ये. माझ्या घरचा आज कार्यक्रम आहे. पण आधी लगीन कोंढाण्याचं. त्यामुळे मी आज ठाण्याला जातोय. सभेचं नावच उत्तर सभा आहे. माझ्या मोठ्या भावाच्या मुलाच्या लग्नाची घरी गडबड आहे. पण साहेबांनी मला यायला सांगितलं आहे. त्यामुळे मी आलोय. असं यावेळी वसंत मोरे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये