भाजपच्या मंत्र्यांची यादी तयार ‘ही’ असणार नावे? सर्वात श्रीमंत नेत्याला मंत्रीमंडळात स्थान?

मुंबई : (Cabinet expansion list prepared) शिंदे-फडणवीसांनी सरकार स्थापन करुन जवळपास पाच उलटल्यानंतरही मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला आहे. मंत्री आणि पालकमंत्री नसल्याने राज्यातील सामान्य जनतेची अनेक कामे खोळंबली आहेत. याच पार्श्वभुमीवर विरोधकांकडून सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत आहेत.
रखडलेले पावसाळी अधिवेशन, जवळ आलेला स्वतंत्र दिवस 15 ऑगस्ट आणि विरोधकांच्या सततच्या टिकेमुळे राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या घडामोडींना वेग आला आहे. फडणवीस आणि शिंदे यांच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली. मंगळवार दि. 08 रोजी शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. पहिल्या टप्प्यात १५ ते १७ जणांना शपथ दिली जाण्याची शक्यता आहे.
यासाठी भाजपकडून ९ आमदारांचे नावे चर्चेत असून, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे-पाटील, बबनराव लोणीकर, प्रविण दरेकर, रविंद्र चव्हाण, नितेश राणे, मंगलप्रभात लोढा यांची नावे आघाडीवर आहेत. भाजपचे सर्वात श्रीमंत आमदार मंगलप्रभात लोढा यांनी देखील मंत्रीमंडळात संधी देण्यात येणार आहे. त्यांनी २०१९ मध्ये विधानसभेच्या निवडणूक शपथपत्रात ४४१ कोटींची संपत्ती असल्याची माहिती होती. ६६ वर्षांचे लोढा मॅक्रोटेक डेव्हलपर्सचे संस्थापक आहेत.