ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

मराठा आरक्षणाला पुन्हा धक्का! ईडब्ल्युएसही जाणार?

मुंबई : (High Court On EWS) मागील अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित होता. त्यात सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करत मोठा धक्का दिला. मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे मराठा समाज अधिक आक्रमक झाला, त्यामुळे राज्य सरकारने ईडब्ल्युएस अंतर्गत मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात जीआर काढला होता.

मात्र, शुक्रवार दि. 29 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने हा जीआर देखील रद्द केल्यामुळे मराठा समाजासाठी मोठा हा धक्का मानला जात आहे. या निर्णयामुळे आता राज्यातील मराठा समाजातील तरुणांना पुढील काळात EWS आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. न्यायालयाच्या निर्णयानंतर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसनेते अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया आली आहे.

अशोक चव्हाण म्हणाले की, एसईबीसी प्रवर्गातील पात्र उमेदवारांना ईडब्ल्यूएसचे लाभ देण्याच्या महाविकास आघाडीच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाचा आजचा निकाल अनपेक्षित आहे. राज्य सरकारने त्यास तातडीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान द्यावे, अशी आमची मागणी आहे. निकालपत्र उपलब्ध झाल्यानंतर विस्तृतपणे बोलता येईल, असही चव्हाण यांनी म्हटले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये