ताज्या बातम्यापुणे

मनसेतून शिंदे गटात आलेल्या नेत्याच्या पत्नीची आत्महत्या; कारण अद्यापही समजले नाही

पुणे | मनसेमधून (MNS) शिंदे गटात (Shinde Group) आलेले निलेश माझिरे (Nilesh Majhire) यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे. पुण्यात राहत्या घरी विष प्राशन करून त्यांनी आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

बाळासाहेबांची शिवसेना गटाचे माथाडी जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे यांच्या पत्नीने बुधवारी विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात नेले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच गुरुवारी रात्री त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला.

कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत असल्याचं सांगितलं जात आहे. कौटुंबिक वादातून माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केली असली तरी हा वाद नेमका काय होता हे अजून कळलेलं नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये