पंकजा मुंडे विधानसभा 2024 च्या तयारीला? नाशकात केली ‘ही’ मोठी घोषणा..

नाशिक : (Pankaja Munde On Assembly Election 2024) आपल्या देशामध्ये जातीवरून वाद चालू आहे. मात्र मी आदिवासी बहिणींसोबत नृत्य केलं. मी आता बुद्ध विहारात जावून भगवान बुद्धांचं दर्शन केलं. महामानव बाबासाहेब आंबेडकरांना फुलं वाहिली. मी अजून एक यात्रा मी 2024 या विधानसभेच्या अगोदर करणार असल्याचे घोषणा पंकजा मुंडे यांनी सिन्नर येथील नांदूर शिंगोटे येथील गोपीनाथ गडावरील सभेत केली.
दरम्यान पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, निस्वार्थ आणि निष्कलंक तसेच निस्सीम भक्ती मुंडे साहेबांच्या वाट्याला आली आणि माझ्या वाट्याला शक्ती आली. या शक्तीचा मी सन्मान करते. तुमचे आशीर्वाद घेऊ पुढं जाते. मी वचन देते, तुमची मान खाली जाणार नाही. स्वाभिमानानेच जगू, असंही म्हटलं आहे.
पकंजा मुंडे पुढं म्हणाल्या की, सर्वांगीण विचार करायला पाहिजे. मला अशी यात्रा करावी लागले, हे मी २०१९ मध्येच ठरवलं होतं. आणखी २०२४च्या विधानसभा निवडणुकीआधी मी पुन्हा यात्रा करणार असल्याची घोषणा पंकजा यांनी केली. त्या यात्रेला काय नाव देईल, हे तेव्हाच सांगेल, असही पंकजा यांनी नमूद केलं.