ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

भाजपवाल्यांचे निषेधाचे नागोबा बिळातून बाहेर पडतात अन्…”, शिवसेनेचा निशाणा

मुंबई : (Uddhav Thackeray On Devendra Fadnavis) काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान हिंगोली येथिल सभेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टिका केली. त्यामुळे मागचे चार दिवस राज्याचे राजकरण तापलं आहे. यावेळी महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेनेला घेरण्याचा भाजपचा प्रयत्न होता. मात्र, शिवसेनेने ‘एक घाव दोन तुकडे’ करत एका बाजूला काँग्रेस राहुल गांधी यांचे कान टोचले तर, दुसऱ्या बाजूला भाजप-शिंदे गटाची सर्व कुंडलीच बाहेर काढली. राहुल गांधी यांनी सावरकरांच्या माफीचा विषय काढताच भाजपवाल्यांचे निषेधाचे नागोबा बिळातून बाहेर पडतात अन् फूत्कार सोडतात. पण ही संधी या नागोबांना राहुल गांधी वारंवार का देतात, हाच संशोधनाचा विषय आहे असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या माफिनाम्यावरून  शिवसेनेने मुखपत्र ‘सामना’मधून आपली भूमिका मांडताना राहुल गांधी यांना सुनावताना भाजप-शिंदे गटाच्या सावरकर प्रेमावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. शिवसेनेने म्हटले की, ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात येताच राहुल गांधी यांचे भव्य स्वागत झाले. जनतेचा प्रतिसादही उदंड लाभला. हे सर्व उत्तम चालले असताना राहुल गांधी यांना सावरकरांच्या कथित माफीचा विषय काढून भाजप व मिंधे गटाच्या हाती कोलीत देण्याची गरज नव्हती हे खरेच, असे सामनाने म्हटले. 

नकली हिंदुत्ववाद्यांना सावरकर प्रेमाचे आचकेउचके लागले. राहुल गांधी व त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यासाठी मिंधे गटाचे लोक काही ठिकाणी रस्त्यावर उतरले. मात्र पुण्यात या लोकांनी राहुल गांधींना सोडून सावरकरांनाच जोडे मारल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली. सावरकरांचा अपमान राहुल गांधींनी केला व त्याचा निषेध केला पाहिजे, पण निषेध करण्यासाठी ज्यांना रस्त्यावर उतरवले त्यांना राहुल व सावरकर यांच्यातला फरक कळला नाही, असा एकंदरीत हिंदुत्वाचा गोंधळ सरकारात उडालेला दिसत असल्याचे सांगत भाजप-शिंदे गटावर निशाणा साधला. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये