ताज्या बातम्यापुणेसिटी अपडेट्स

दहीहंडीत कोसळले साऊंड सिस्टिमचे स्टेज

पुणे | Pune News – पांगूळ आळी येथे श्रीकृष्ण मंडळाची दहीहंडीसाठी साउंडसिस्टिम लावत असताना दुचाकीचा धक्का लागून साउंड उभारण्याचा स्टेज कोसळल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी घडला. या घटनेत दोन महिलांसह तिघेजण किरकोळ जखमी झाले.

शहरातील मध्यभागात दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. पांगूळ आळीतील श्रीकृष्ण मंडळाचा दहीहंडी उत्सव हा आकर्षणाचा असतो. श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा करण्यासाठी तसेच डीजे तालावर ताल धरण्यासाठी गुरुवारी दुपारी साउंड सिस्टिम लावण्यासाठी स्टेज बांधण्याचे काम सुरू होते. त्यावेळी दुचाकीचा धक्का लागून साउंड उभारण्याचा स्टेज कोसळल्याचा प्रकार घडला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये