ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

राष्ट्रवादीत नवा ट्विस्ट! अजित पवार गटाने वायबी सेंटर येथे शरद पवारांची घेतली भेट

मुंबई (Ajit Pawar Group Meet Sharad Pawar) राष्ट्रवादीतील फुटीला फक्त ११ दिवस झाले आहेत अशातच आज घडामोडींना मोठा वेग आला आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे सर्व मंत्री राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची वायबी सेंटर येथे भेट घेतली. या भेटीमुले राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत तर नेत्यांच्या भुवया देखील उंचावल्या आहेत. या भेटीत नेमकी काय चर्चा होते, आणि शरद पवार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, अनिल पाटील धर्मराव बाबा पाटील, संजय बनसोडे, नरहरी झिरवळ यांच्यासह सर्वच नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे.

या मंत्र्यांसोबत अजित पवारही आहेत. अजितदादा दुसऱ्यांदा शरद पवार यांच्या भेटीला आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अजित पवार हे परवाच शरद पवार यांच्या घरी गेले होते. त्यांची काकू प्रतिभा पवार या आजारी असल्याने त्यांना भेटण्यासाठी अजित पवार गेले होते. अजितदादानंतर आता राष्ट्रवादीचे मंत्रीही शरद पवार यांना भेटायला गेल्यामूळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये