ताज्या बातम्यादेश - विदेशमनोरंजन

“…त्यासाठी ६.५ लाख मागितले,” अभिनेता विशालच्या तक्रारीवर मोदी सरकारचा खेदनामा

नवी दिल्ली : (Central Government On Actor Vishal Complaint) गुरुवार दि. २८ सप्टेंबर रोजी तामिळ अभिनेता विशालने एक व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये त्याने चित्रपटसृष्टीतील भ्रष्टाचाराबद्दल सांगितलं आहे. ‘मार्क अँटनी’ नावाचा चित्रपट हिंदीत प्रदर्शित करण्यासाठी सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्याला ६.५ लाख रुपये दिल्याचा दावा त्याने व्हिडीओमध्ये केला. त्याच्या या दाव्यानंतर खळबळ उडाली आहे. त्याच्या व्हिडीओची दखल केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयानेही घेतली आहे.

“अभिनेता विशालने CBFC मधील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुढे आणला आहे. घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. सरकार भ्रष्टाचार अजिबात सहन करणार नाही. यामध्ये कोणीही सहभागी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याची आजच मुंबईत नियुक्ती करण्यात आली आहे. CBFC कडून छळवणुकीच्या इतर घटनांबद्दल माहिती देऊन मंत्रालयाला सहकार्य करा,” असं आवाहन मंत्रालयाने केलं आहे.

“आम्ही मार्क अँटनी चित्रपट प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज केला होता पण आम्हाला प्रमाणपत्रासाठी रुपये ६.५ लाख भरण्यास सांगण्यात आलं. आम्हाला आधी चित्रपट पाहण्यासाठी ३ लाख रुपये पाठवायचे होते आणि नंतर प्रमाणपत्रासाठी उर्वरित ३.५ लाख रुपये द्यायचे होते. माझ्याकडे कोणताही पर्याय नव्हता, त्यामुळे मला पैसे द्यावे लागले. मला प्रमाणपत्र मिळाले आणि चित्रपट उत्तर भारतात प्रदर्शित झाला. मी उच्च अधिकार्‍यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती करतो,” असं विशाल म्हणाला होता.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये