ताज्या बातम्यामनोरंजनरणधुमाळी

“पठाण चित्रपटात शाहरुख खानने माझाच लूक काॅपी केलाय”; बिगबॉस फेम बिचुकलेंचा मोठा दावा

मुंबई : (Abhijit Buchukle On Shahrukh Khan)आपल्या वेगवेगळ्या विधानाने नेहमी माध्यमांच्या चर्चेत राहणारा बिगबॉस (Big Boss) फेम अभिनेता अभिजीत बिचुकलेने (Abhijit Bichukle) मोठं विधान केलं आहे. ते म्हणाला, “शाहरुख खानचा (Shahrukh Khan) पठाण चित्रपटातील (Pathan Film) लूक माझ्यासारखा आहे. कारण मी बिगबॉसमध्ये असताना शाहरुख खान बिगबॉस पाहत होता,” असा दावा अभिजीत बिचुकलेने केला.

“माझी बिग बॉसमधील हेअरस्टाईल होती. १९९१ मध्ये मी लहान होतो तेव्हा संजूबाबा म्हणजे संजय दत्तचे (Sanjay Datt) लांब केस होते. मात्र, आता २२ वर्षांनी जी स्टाईल आणली गेली ती माझी. मला वाटतं शाहरूख खान बिग बॉस बघत होता. सिझन नंबर १५ मध्ये मी काय करिष्मा केला, ‘मैंने क्या गुल खिलाए’ हे शाहरूखनेही पाहिलं आहे. लोकांनीही ते पाहिलं आहे. त्यामुळे ही लांब केसांची स्टाईल माझ्यामुळे ट्रेंडमध्ये आली असावी,” असं मत अभिजीत बिचुकलेने व्यक्त केलं.

“सलमान खान (Salman Khan) आणि मी एका इंडस्ट्रीत आहोत. फिल्म इंडस्ट्री असेल किंवा राजकारण असेल इथं कोणी कोणाचा शत्रू असतो असं मला वाटत नाही. त्या त्यावेळी ते घडून गेलेलं असतं. राहिला विषय आज सलमान खानचा वाढदिवस आहे याचा, तर ते नेहमीप्रमाणे साजरा करत आहेत. त्या माणसाचंही माझ्यावर प्रेम आहे. त्यामुळे माणूस म्हणून त्याला माझ्या शुभेच्छा आहेच,” असंही अभिजीत बिचुकलेने नमूद केलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये