ताज्या बातम्यारणधुमाळी

“मुख्यमंत्र्यांच्या सभेत दम नव्हता, पैसे देऊन…”, चंद्रकांत खैरेंचा खोचक टोला

औरंगाबाद | Chandrakant Khaire On CM Eknath Shinde – काल (12 सप्टेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पैठण येथे मंत्री संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघात सभा पार पडली. या सभेनंतर विरोधकांनी टीका करण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये आता शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी पैसे देऊन गर्दी जमवल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकाराची एक ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती. त्यानंतर कालच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत काही दम नव्हता, असा टोला चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांशी बोलताना लगावला आहे.

यावेळी चंद्रकांत खैरे म्हणाले, “कालच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत दम नव्हता. या सभेसाठी पैठण मतदारसंघातले लोकं फक्त 25 टक्के होते. बाकीचे लोकं हे फुलंब्री, सिल्लोड, पाथर्डी, शेवगाव अशा ठिकाणांहून आणले होते, हे मी पुराव्याशिवाय बोलत नाही”, अशी टीका खैरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संदीपान भुमरे यांच्यावर केली आहे. तसंच मला काल अनेक लोकांचे फोन आले, त्यांना 300 रूपये आणि 500 रूपये देऊन सभेसाठी नेण्यात आल्याचा दावा देखील खैरे यांनी यावेळी केला.

दरम्यान, “मुख्यमंत्र्यांच्या पैठण येथील सभेनंतर आम्ही मतदारसंघात जाऊन लोकांना भेटणार आहोत. लोकांशी चर्चा करणार आहोत, आम्ही वातावरण निर्मिती करणार आहोत. मी गेलो की वातावरण निर्मिती होते, कारण मी ओरिजनल आहे ना.” असंही चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये