ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

भुमरे फक्त 8 दिवसाचे पालकमंत्री; माजी खासदाराचा गौप्यस्फोट, चर्चेला उधाण

छत्रपती संभाजीनगर : (Chandrakant Khaire On Sandipan Bhumare) “कोण पालकमंत्री? मी उन्हात उभा आहे, सुर्याच्या साक्षीने आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साक्षीने सांगतो, संदीपान भुमरे फक्त आठ दिवस पालकमंत्री राहणार आहेत. तुम्हाला खोटं वाटत असेल तर लिहून घ्या” असं वक्तव्य शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे.

नेते चंद्रकांत खैरे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना हा गौप्यस्फोट केला आहे. त्याचे काय कारणं असतील ते तुम्ही शोधा पण ते फक्त आठ दिवसंच पालकमंत्री म्हणून राहणार आहेत असंही ते म्हणाले.

पैठण येथील आमदार आणि मंत्री संदीपान भुमरे हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतर त्यांच्यात आणि छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये चांगलीच जुंपली होती. दोघेही एकमेकांवर आरोप प्रात्यारोप करत असून खैरे वारंवार वेगवेगळ्या प्रकारचा दावा करत असतात.

शिंदे गटातील काही आमदार माझ्या संपर्कात असून ते पुन्हा ठाकरे गटात येणार असल्याचा दावासुद्धा खैरे यांनी केला होता. त्यानंतर भुमरे हे फक्त आठ दिवस पालकमंत्री राहणार आहेत या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये