“शिंदे गटातील 10-15 आमदार आम्हाला फोन करून म्हणतात…”, चंद्रकांत खैरेंचा गौप्यस्फोट!
औरंगाबाद | Chandrakant Khaire On Shinde Group MLA – काल (28 ऑगस्ट) शिंदे गटातील आमदार संदीपान भुमरे यांनी खळबळजन वक्तव्य केलं होतं. पैठणमध्ये बोलताना त्यांनी ठाकरे गटातील दोन आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर आता औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
“शिंदे गटातील काही आमदार सध्या अस्वस्थ आहेत. ते आता आम्हाला फोन करतात आणि म्हणतात की, साहेब आमचं चुकलं, आम्हाला माफ करा. असं जवळपास 10 ते 15 जण त्यांना माहितीये की आपण फक्त 50 जण आहोत आणि भाजपवाले 116 आहेत. ते कोणत्याही पक्षाचे आमदार फोडतील आणि त्यांचा कोटा पूर्ण करून आपल्याला आऊट करतील, त्यामुळे ते आमच्या संपर्कात आले आहेत”, असं चंद्रकांत खैेरेंनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
पुढे चंद्रकांत खैरे म्हणाले, “संदीपान भुमरे हा तर गावठी मंत्री आहे, त्याला काही कळत नाही, तो काहीही बोलतो, त्याचा अभ्यास अजिबात नाहीये, मंत्रिपद कसं चालवायचं हेही त्याला कळत नाही, नशीबाने ते आमदार झाले आहेत.” अशा शब्दांत खैरे यांनी संदीपान भुमरे यांच्यावर टीका केली आहे.