माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भावाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या
लातूर : (Chandrasekhar Patil Chakurkar suicide) माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर (Shivraj Patil Chakurkar) यांच्या चुलत भावाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये समोर आल्याने खळबळ उडाली आहे. चंद्रशेखर पाटील चाकूरकर (वय 81 वर्षे) (Chandrasekhar Patil Chakurkar) असे आत्महत्या करणाऱ्या चाकूरकरांच्या भावाचे नाव आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पोलिसांकडून पंचनामा करण्यात येत आहे. तर चंद्रशेखर चाकूरकर यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी परिचित असलेल्या अनेकांना ‘गूड बाय’ असा टेक्स मॅसेज केला होता.
चंद्रशेखर चाकूरकर यांनी आधीच आत्महत्या करण्याचा निश्चीय केला असल्याचं समोर आले आहे. कारण आज सकाळी जेव्हा ते नेहमीप्रमाणे घरातून बाहेर पडले, त्यानतंर त्यांनी स्वताच्या मोबाईल मधील परिचित असलेल्या अनेकांना ‘गूड बाय’ असा टेक्स मॅसेज केला होता. तर काही वेळाने व्हॉट्सअँपवर देखील त्यांनी ‘गूड बाय’ स्टेटस ठेवला होता. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या परवानाधारक पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली आहे.
चंद्रशेखर पाटील चाकूरकर हे वडिलोपार्जित शेती पाहत होते. त्यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत. सर्वच मुलांची लग्न झाले आहेत. तर ते सध्या एका मुलाबरोबर शिवराज चाकूरकर यांच्या घराच्या बाजूला असलेल्या फ्लॅटमध्ये राहत होते. वयोमानाप्रमाणे त्यांना अनेक शारीरिक व्याधी होत्या. त्यामुळे ते सततच्या आजारपणाला ते कंटाळून गेले होते. त्यातून हे कृत्य केले असावे, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.