इतरक्राईममहाराष्ट्रमुंबई
चुलत्यानेच केला पुतणीवर बलात्कार
चेंबूर : मुंबईतील चेंबूरमध्ये मनाला हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. चुलत्याने १५ वर्षीय मुलीला गुंगीचे औषध टाकून बलात्कार केला. चुलता इतक्या खालच्या स्तराला गेला की त्याने अत्याचाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल केला. चेंबूरमधील वाशीनाका परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नराधम चुलत्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. चेंबूर (Chembur) मध्ये १५ वर्षीय मुलीच्या शितपेयात गुंगिचं औषध टाकून बेशुद्धावस्थेत चुलत काकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने बलात्काराचा व्हिडिओ व्हायरल केला. वाशीनाका चेंबूर येथील धक्कादायक प्रकार घडला. नराधम काकाला केली आरसीएफ पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.