“…संजय राऊत जरा तरी तमा बाळगा”; मराठा क्रांती मोर्चाच्या फोटोवरून संभाजी राजे संतापले

Mumbai : (Chhatrapati Sambhajiraje On sanjay Raut Tweet) काल महाविकास आघाडीचा महामोर्चा मुंबईत (mahavikas aghadi mahamorcha mumbai) पार पडला. या मोर्चात जमलेल्या लोकांच्या संख्येवरून भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी महाविकास आघाडीला हा मोर्चा अयशस्वी झाल्याचे म्हणत मोर्चावर टीका केली. मोर्चात आलेल्या लोकांच्या संख्येवरून सरकारमधील नेत्यांनी महाविअस आघाडीच्या महामोर्चावर तीउका केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल महामोर्चावर टीका करताना प्रसारमाध्यमांना सांगितले की, “मोर्चा अयशस्वी झालेला आहे. हा मोर्चा महामोर्चा नसून नॅनो मोर्चा म्हणावा लागेल. कारण या मोर्चामध्ये कसलीही गर्दी दिसली नाही. त्यामुळे प्रसार माध्यमांनाही ड्रोन द्वारे शूटिंग केलेले फोटो कुठेही दिसला नाही. या टीकेनंतर संजय राऊत यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत फडणवीसंना ते फोटो बघायला सांगितले.
दरम्यान, संजय राऊत यांनी शेअर केलेले फोटो हे मराठा क्रांती मधील असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीराजे यांनी संजय राऊतांवर निशाना साधला आहे. ट्वीट करत त्यांनी, “आज नसलेली ताकद दाखविण्यासाठी एकेकाळी ज्या मराठा समाजाला हिणवलं, त्यांचाच मोर्चा वापरताना जरा तरी तमा बाळगा.” अशी टीका केली आहे.