शिवप्रेमींसाठी आनंदवार्ता! फक्त पुस्तकांत वाचलेले, शिवरायांची वाघनखे ‘लवकरच’ महाराष्ट्रात येणार

मुंबई : महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींसाठी एक आनंदवार्ता समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे लंडनवरुन परत आणण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे. येत्या नोव्हेंबर महिन्याच्या १६ तारखेला महाराजांची वाघनखे मुंबईत आणली जाणार आहे. अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
त्यामुळे महाराष्ट्रातील शिवप्रेमींसाठी ही अतिशय अभिमानाची बाब आहे. राज्य सरकार ३ ऑक्टोबर रोजी लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तू संग्रहालयासोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखे भारतात आणण्याबद्दल करार करणार आहे. या करारानंतर पुढील ३ वर्षांसाठी वाघनखे महाराष्ट्रात आणण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी याच वाघनखाच्या सहायाने अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता. तिच वाघनखे भारतात आणून येथील जनतेच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेसाठी ही महत्त्वाची बातमी आहे.