कर्नाटकातील भाजपच्या पराभवावर मुख्यमंत्री बोम्मईंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “काँग्रेसनं…”

Karnataka Election Result 2023 | सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे असून निकाल समोर येत आहे. या निवडणुकीत यंदा काँग्रेसनं बाजी मारली आहे. आत्तापर्यंतच्या मतमोजणीमध्ये काँग्रेसनं 124 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजप पराभवाच्या दिशेनं जाताना दिसत आहे. यादरम्यान, भाजपच्या पराभवावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (CM Basavaraj Bommai) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी बसवराज बोम्मई म्हणाले की, “निवडणूकीच्या शेवटच्या टप्प्यातील निकाल समोर येत आहेत. खूप मेहनत घेऊनही आम्ही छाप पाडू शकलो नाही. काँग्रेसनं आकडा गाठला आहे. आम्ही निकाल आल्यानंतर तपशीलवार विश्लेषण करू. एक राष्ट्रीय पक्ष म्हणून आम्ही फक्त विश्लेषणच करणार नाही तर विविध स्तरांवर आम्ही कुठे कमी पडलो हे देखील पाहणार आहोत. तसंच आम्ही आमच्या पक्षाची पुर्नबांधणी करू आणि लोकसभा निवडणूक ताकदीनं लढवू.”