ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी

निवडणुक आयोगासमोरची सत्तासंघर्षाची सुनावणी संपली! पुढील सुनावणी नव्या वर्षात…

नवी दिल्ली : (Shivsena And Shinde Group Election Commission Hearing) 20 जून 2022 रोजी एकनाथ शिंदेंनी बंडाची निशानी फडकवली अन् राज्याच्या राजकारणाला नवी कलाटणी मिळाली. कोणत्याही जानकारांना वाटले नसेल एकनाथ शिंदे शिवसेनेशी बंडखोरी करतील अन् पक्षाला मोठं भगदाड पाडतील. पण म्हणतात ना सत्तेच्या मोहासाठी कोण काय करेल ते सांगता येत नाही. तेच शिंदेंच्या बाबतीत घडलं.

दरम्यान, शिंदे फक्त बंडखोरी करुन शांत बसले नाहीत तर, त्यांनी शिवसेना पक्षावरही दावा ठोकला आहे. त्यामुळे हा वाद सर्वोच्च न्यायायलयात केला. तीन महिन्यांनी न्यायालयाने पक्षाचे नाव आणि चिन्हाचा वाद केंद्रीय निवडणुक आयोगाकडे दिला. त्यानंतर अंधेरी पुर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्चभुमीवर आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्ह धनुष्यबाण हे हंगामी दोन्ही गटाला न वापरण्याचे निर्देश देण्यात आले.

याच पार्श्चभुमीवर सोमवार दि. 12 नोव्हेंबर रोजी केंद्रीय निवडणुक आयोगासमोर पक्षाचे नाव आणि चिन्ह यावर सुनावणी घेण्यात आली आहे. यावेळी आयोगाने दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकला आणि पुढील सुनावणीची तारीख देण्यात आली आहे. या सत्तासंघर्षाची सुनावणी आता पुढील वर्षी म्हणजे जानेवारी 2023 च्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याची माहिती शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी माध्यमांना दिली आहे. मात्र, तारीख अद्याप देण्यात आली नसली तरी पहिल्या आठवड्यात हि सुनावणी पार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये