‘गुड टच-बॅड टच’ विषयी जनजागृती
पोलिसांकडून बाललैंगिक शोषण संवेदना कार्यशाळा!
पुणे child abuse awarness : बाललैंगिक शोषणाच्यासंदर्भात पुण्यात कार्यशाळा आयोजिण्यात आली होती. या कार्यशाळेत सुमा ९०० शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक, कर्मचारी सहभागी झाले होते. मुलांचे लैंगिक शोषण, लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांच्या संरक्षणाच्या तरतुदी या विषयांवर ही कार्यशाळा आयोजिली होती. पुणे शहर पोलिसांच्यावतीने ही कार्यशाळा झाली. यावेळी पुणे आणि परिसरातील सुमा ९०० शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि व्यवस्थापन समिती सदस्य सहभागी झाले.
लांचे लैंगिक शोषण, लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांच्या संरक्षणाच्या तरतुदी, पोक्सो कायदा आणि ‘गुड टच-बॅड टच’ या विषयांवर कार्यशाळेत चर्चा झाली. पुणे पोलिस सहआयुक्त संदीप कर्नील यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी आणि पुण्यातील सर्व पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक सहभागी झाले होते.
कार्यशाळेत शाळकरी मुलांचे लैंगिक शोषण, पोक्सो कायद्यातील तरतुदी, तंबाखू, दारू आणि ड्रग्ज यांसारख्या पदार्थांबाबत जनजागृती करणे आणि मुलांसाठी सुरक्षित वाहतूक व्यवस्था या विषयांवर सत्रांचा समावेश होता. ‘गुड टच-बॅड टच’ या संकल्पनेवर लक्ष केंद्रित करणार्या मुलांसाठी पोलिस कार्यशाळा आयोजित करत आहेत. या ठिकाणी वर्तन, लैंगिकता, लैंगिक समस्या आणि लैंगिक अत्याचाराशी संबंधित पैलूंबद्दल संवेदनशील केले जाते. या कामांसाठी पोलिस वर्तणूकतज्ज्ञ, बालमानसशास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घेतात.
विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची
माध्यमिक शालेय शिक्षण विभाग, पुणे जिल्हा परिषद, पुण्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची संघटना आणि सलाम बॉम्बे फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पोलिस अधिकार्यांनी सांगितले, की अलीकडच्या काळात घडलेल्या घटनांमुळे पालक, शाळेचे अधिकारी, शिक्षक, समुपदेशक आणि पोलिस यांचा समावेश असलेल्या प्रत्येक भागधारकाची मुलांच्या हितासाठी आणि सुरक्षिततेसाठी कशी महत्त्वाची भूमिका आहे, हे अधोखित झाले आहे.
अधिकार्यांनी सांगितले, की कार्यशाळेने सर्व भागधारक आणि मुलांमध्ये विश्वासाचे वातावरण आणि सामायिकरणाचे महत्त्व अधोखित केले. राज्यातील सर्व शाळांमधील मुला-मुलींमध्ये कार्यक्रम व उपक्रमांद्वा चांगला स्पर्श किंवा वाईट स्पर्शाविषयी (गुड टच, बॅड टच) जागृती होणे आवश्यक आहे. तसेच मुला-मुलींमध्ये आत्मविश्वास वाढावा, स्वतःच्या हक्काची व कर्तव्याची जाणीव निर्माण व्हावी, यादृष्टीनेदेखील विविध उपक्रमांचे आयोजन काळाची गरज आहे.
चौथी ते आठवीच्या वर्गातील मुला-मुलींसाठी चांगला स्पर्श-वाईट स्पर्शाविषयी जागृती करावी. शारीरिक, मानसिक पीडा, लैंगिक शौषण यासारखे प्रसंग मुला-मुलींसोबत घडल्यास त्यांनी भीती न बाळगता याबाबत शिक्षक, पालक, मित्र-मैत्रिणी, विश्वासू व्यक्तींना माहिती द्यावी, यासाठी त्यांच्यात धैर्य निर्माण करण्यासाठी असे उपक्रम अत्यंत जनजागृतीपर ठरणार आहेत. पोलिसांकडून अशा विषयांबाबत जनजागृती केली गेल्यास समाजात विशेषकरून मुलांमध्ये वाढते भय कमी होण्यास मदत होणार आहे.