#उखाड दिया! “…म्हणून फडणवीसांनी अख्खं राज्य सरकार घरी बसवलं”
मुंबई | Chitra Wagh On Shivsena – एकनाथ शिंदे चाळीसहून अधिक आमदार सुरुवातीला सुरत आणि त्यानंतर गुवाहाटीला घेऊन जात बंड केलं आहे. शिंदे यांनी पुकारलेल्या या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरणात अनेक घडामोडी घडल्या. बहुमत चाचणी घेण्यावर सर्वोच्च न्यायालयही ठाम राहिलं. या निकालानंतर काही वेळातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. दरम्यान आज (गुरूवार) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्याचे नवे मुख्यमंत्री (CM) असतील. त्यांनी राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. त्यानंतर सर्व स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामध्ये आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
“105 आमदारांना घरी बसवलं म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना हिणवणाऱ्यांनो आता त्याच देवेंद्र फडणवीस यांनी अख्खं राज्य सरकार घरी बसवलंय!,” असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे हे मुंबईत दाखल झाले आणि त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली. यानंतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आहे. यात फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे. भाजपाच्या साथीने शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मविआ सरकारमधले नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत.