‘चित्रा मेरी सासू’ म्हणल्यानं वाद चिघळला! उर्फीला चित्रा वाघ यांचे सडेतोड प्रत्युत्तर, म्हणाल्या…

मुंबई : (Chitra Wagh On Urfi Javed) बिग बॉस फेम आणि अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या सुरु असलेले वाकयुद्ध संपता संपत नाही. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या तोकड्या कपड्यांवरून तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत मुंबई पोलिसांना पत्रही देण्यात आलं. तसेच, उर्फीने असाच नंगानाच सुरु ठेवला तर तिचं थोबाड फोडणार, अशी आक्रमक भूमिका चित्रा वाघ यांनी घेतली होती. त्यावर काही तासांपूर्वी उर्फीने ट्वीट करत चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला. “मेरी डीपी इतनी धांसू, चित्रा मेरी सासू,” असं उर्फीने यात म्हटलं. त्यावर आता चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उर्फी जावेदने काही तासांपूर्वी दोन ट्वीट करत चित्रा वाघ यांना डिवचलं होतं आहे. उर्फीने एक फोटो ट्वीट केला आहे. त्यावर तिने चित्रा वाघ यांना टॅग करत लिहिलं की, “लेकिन अभी बोहोत सुधार बाकी है. सॉरी चित्रा वाघ जी. आय लव्ह यू.” तर दुसऱ्या एका ट्वीटमध्ये, “मेरी डीपी इतनी धांसू, चित्रा मेरी सासू,” असं उर्फीने म्हटलं आहे. त्यावर आता चित्रा वाघ यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
“मला यावर काहीही बोलायचं नाही. तिने कितीही काहीही लिहिलं, शब्दांची मोडतोड केली, मला काहीही बोलली तरी हा नंगानाच आम्ही छत्रपतींच्या महाराष्ट्रात चालू देणार ही आमची भूमिका कालही होती, आजही आहे आणि यापुढेही राहिल. आमच्याकडे प्रत्येक रोगावर औषध आहे”, असे चित्रा वाघ यांनी म्हटले.